April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ तर मास्क न वापरण्याऱ्या ३८६ लोकांवर मनपाची कारवाई – ५ दिवसात ७८,५०० रुपये दंड वसूल

मास्क न वापरण्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईत चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी ३८६ लोकांवर कारवाई केली असून ७८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या ३८६ नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या १७ नागरीकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आढळून येत असल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणार्‍यांना व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला ३ मास्कसुद्धा देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे तसेच सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!