April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना आपापल्या राज्यात परतता येणार

इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आता घरी जाता येणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपापल्या घरांपासून दूरच्या भागांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटन यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक यांना आता आपापल्या घरी जाण्यासाठीचा प्रवास करण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, आता गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून हे सर्वजण लवकरच आपल्या स्वगृही परतु शकणार आहेत.सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे असून अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यात अडकलेल्या लोकांची यादी ही नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणे गरजेचे आहे.

जर एखाद्या समूहाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असे तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर संमती दर्शवणे गरजेचे आहे.

प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे स्क्रिनिंग करणे महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमध्ये लक्षणे नाहीत त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जावी.

Advertisements

प्रवासासाठी बसचा वापर केला जावा. या सर्व बसेसचे निर्जुंतीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही बंधनकारक असेल.

आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी. तसेच, त्यांना होम क्वॉरंटाईन केले जावे. गरज असल्यास संस्थात्मक क्वॉरंटाईन करावे.

Advertisements
error: Content is protected !!