April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर : संचारबंदी कायम असतानाही मागील दोन दिवसांत नागरिक विनाकारण बाहेर पडत आहे. हे थांबावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर पोलिसांनी रूट मार्च काढला.

जिल्हाधिकारी यांनी 3 मे पर्यंत संचारबंदी कायम राहणार, यात कुठलीही सूट दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतरही अनेक लोक दुकाने उघडी झाली असे समजून बाहेर पडत आहेत. काही दुकानदार देखील आपली दुकाने उघडण्यासाठी बाहेर पडत आहे. यामुळे शहरात गर्दी चांगलीच वाढत आहे. काल तर नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. हे पाहून पोलिसांची देखील तारांबळ उडाली. जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नसताना अशी झुंबड उडणे अत्यंत धोकादायक आहे. यावर आता पोलीस सक्रिय झाले आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात शहरात रूट मार्च काढण्यात आला. जटपुरा गेट, गिरणार चौक, पठाणपुरा गेट, बालाजी वॉर्ड असा हा मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांची फौज होती. त्यांनी नागरिकांनी आपल्या घरातच राहावे, संचारबंदीत कुठलीही सूट देण्यात आली नाही असे आवाहन केले. हा रूट मार्च आता दररोज शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.

Advertisements
error: Content is protected !!