April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

तेलंगानातुन आलेल्या 71जणांना मजदूरांना घेऊन जाणारे तीन कंटेनर सावली पोलिसांनी घेतली ताब्यात !

चंद्रपूर : मजुरांना घेऊन तेलंगणाहून छुप्या पद्धतीने छत्तीसगडला जाणारे तीन कंटेनर सावली पोलिसांनी पकडले. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरआज पहाटे करण्यात आली. यात 68 मजूर आणि तीन चालक अशा 71 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मस्के आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप नितनवे यांनी केली.

तेलंगणात अडकलेल्या मजुरांनी आता आपल्या स्वगावी परतण्यासाठी मिळेल तसा प्रवास सुरु केला आहे. हा पूर्ण प्रवास चंद्रपूर मार्गाने होत असल्याने एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. हे मजूर समूहाने पायदळ, मिळेल त्या साधनाने प्रवास करीत आहेत.

अशेच मजूर आता कंटेनरमधून प्रवास करताना आढळून आले. आज सकाळी तीन कंटेनर पकडण्यात आले ज्यात 68 मजूर होते. रात्री प्रवास करून हे कंटेनर जात होते.

हे सर्व छत्तीसगड राज्यात जात होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोन्टीन करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!