April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

ऑनलाईन बोलवलेले चिकन खाल्ल्याने युवा अभियंत्याचा मृत्यू नागपूर शहरातली घटना ?

नागपूर : बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय नागरिकांची जीवनशैली आधुनिक झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तू आता घरोघरी ऑनलाईन पोहोचू लागल्या आहेत. वेळ आणि श्रम वाचविण्याच्या उद्देशाने या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागपुरात एक वेगळीच घटना पुढे आली आहे.

ऑनलाईन बोलावलेले चिकन खाल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना लक्ष्मीनगरमधील आठरस्ता चौकात घडली. विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. या अभियंत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज ताकसांडे हा सॉफ्टवेअर अभियंता होता.

तो पत्नी पूजासोबत आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहायचा. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन बोलाविले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तेथून बाहेर येताच तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विराज याला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!