April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

एसआरपीएफच्या पोलिस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या गडचिरोली जिल्ह्यातील घटना सोलापूर जिल्ह्याचे निवासी असलेले चंद्रकांत शिंदे होते तणावात

नागपूर. एसआरपीएफ सोलापूर गट दहा या बटालियन मधील एका पोलिस उपनिरीक्षकाने बुधवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास आपल्या सर्विस रिवाॅल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोेरा पोलिस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलिस मदत केंद्रात घडली. एसआरपीएफची सदर तुकडी मागिल दीड ते दोन महिन्यांपासून सावरगाव येथे कर्तव्यावर आहे. चंद्रकांत शिंदे (वय 45 वर्ष) असे मृतक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्याचे निवासी असल्याची माहिती आहे.

दिवंगत शिंदे हे कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते. त्यांना मागील 6 ते 7 वर्षांपासून पाठीच्या कण्याचा गंभीर त्रास होता. त्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षली भागात तैनाती झाल्याने सतत ऑपरेशन मोडवर रहावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिक वाढत गेला असल्याने शारीरिक व्याधीला कंटाळून निराशेच्या गर्तेत येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Advertisements
error: Content is protected !!