April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोना संकटासाठी भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती कडून एक लाखाची मदत

(भद्रावती  प्रतिनिधीशाम चटपल्लीवार ) देशावर आढळलेल्या कोरोना या महाभयानक सं कटाच्या सामना करण्यासाठीं अनेक मदतीचे हात पुढे आले असतानाच सामाजिक दायित्वाची भावना जोपासून भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीने चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले आहे .कोरोना संकटातमुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अळकले आहे.तर अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचावर उपास मारी ची पाळी अली आहे.काम अभावी पैसा नाही आणि पैसा अभावी राशन नाही .त्यामुळे पोट जगावायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला.त्यामुळे खासदार बाळू धानोरकर आणि वरोरा -भद्रावती क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गरजू व्यक्ती साठी रोज ६ हजार लोकांना भोजन दान करण्याचे कार्य सुरु केले. या कार्याला स्वइच्छेने मदत करण्यासाठी सर्वच स्तरातील लोकांना मदतीचे आव्हान केले. या आव्हानाला प्रतिसाद देऊन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीने खासदार बाळू धानोरकर एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, उपसभापती अश्लेशा जीवतोडे ,संचालक ज्ञानेश्वर डुकरे,संजय पोटे,प्रवीण बांदुलकर,ईश्वर धांडे, दत्तात्रय महातळे,सुनील मोरे, प्रदीप धागी,रांगणकर,बाजर समितीचे सचिव पारखी आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Advertisements
error: Content is protected !!