April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

गडचांदूर पोलिसांवरील हमल्याची सर्व स्तरातून निंदा : आरोपी अटकेत, : पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांची माहिती

संपूर्ण देशात लॉकडाऊन असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील संचारबंदी असताना गडचांदूर शहरातील सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असता क्रिकेट खेळणाऱ्या एका शासकीय नोकरीत असणाऱ्या इंजिनिअर व त्याच्या परिवाराने पोलिसांवर बॅट व स्टम्प ने हमला केला असता एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली आहे.

यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी अधिकृत माहिती महाराष्ट्र मेट्रो ला दिली असून सविस्तर माहिती नुसार आज दिनांक 19 एप्रिल दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गडचांदूर पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती माने व रोहित चिडगिरे शहरात गस्तीवर असताना सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर काही युवक क्रिकेट खेळताना आढळले. पोलिसांनी यांना संचारबंदी असून क्रिकेट खेळण्यास मनाई करत घरी जाण्यास सांगितले असता खेळत असलेला इंजिनिअर अविनाश चव्हाण अचानक पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ करायला लागला.

गंभीर जखमी तिरुपती माने यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दाखल केले असता त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले व तिरुपती माने यांना सुद्धा प्रथमोपचार करून चंद्रपूर ला हलविण्यात आले.

अनुचित घडणेचे समर्थन मि करणार नाहीत व हल्ला करण्यावर कार्यवाही झालीच पाहिजे असे पत्र राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.आमदार अँड.संजय धोटे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीवर उचित कार्यवाही करण्यास निवेदन दिले आहे.

Advertisements

राजूरा उप विभागात कार्यरत असलेले जलसंधारण विभागाचे अभियंता अविनाश चव्हाण व ईतर यांनी तिरुपती माने व रोहित चितगरे या पोलिस कर्मचाऱ्यांना माराहाण करण्यात आली. सदर घडणा हि निषेधार्ह असून अशा प्रकारचे अभियंता ला करणे शोभणिय नाहीत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारीना मारहाण करणे हि बाब निंदनीय ,शोकास्पद बाब आहेत म्हणून मि घडलेल्या प्रकरणात अविनाश चव्हाण अभियंता जलसंधारण विभाग राजुरा व ईतर याच्या विरोध कडक कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे करतो-माजी आमदार संजय धोटे राजुरा

Advertisements
error: Content is protected !!