April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

शहर पोलिस गुन्हे विभागाचे कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी, प्रकाश नगर महाकाली कॉलरी परिसरात असलेल्या रेती बंकर जवळ लाखोंचा मौवा दारूसाठा केला जब्त !

उपनिरीक्षक सुशील कोडापे यांच्या नेत्रुत्वात केले कोम्बिंग ऑपरेशन 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय.मात्र संचारबंदीचा फायदा उचलत काहीनि मोहफुलाची दारू काढून विकायला सुरुवात केली.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या रेती बंकर जवळ मोहफुलाची दारू काढत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली.पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी धाड टाकली.यात 20 लीटर मोहा दारू,100 किलो सड़वा,एका दुचाकीसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी जवळपास 1 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सुशील कोडापे,स्वामी चालेकर,महेन्द्र बेसरकर,सिद्धारत रंगारी, सतीश टोंगलकर,सचिन बुटले,बाबीटकर,सतीश बोबडे यांनी केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!