April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

मध्ये कामावर जात नाही म्हणून पत्नीने पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथे उघडकीस आली आहे.त्यानंतर पत्नी विरोधात पतीने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.कोरोना विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले आहे. परंतु, देशात व राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये.यासाठी केंद्र व राज्य शासनाने महत्त्वाची पाऊले उचलली असून सर्वत्र लॉक डाऊन केले आहे. संचारबंदी असल्याने कोणीही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. अशातच लॉकडाऊन मध्ये कामावर जात नाही म्हणून पत्नीने पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथे उघडकीस आली.घरात खायला काही नाही,दिवसभर घरात असता, म्हणून पत्नीने पतीला मारहाण केली.त्यानंतर पत्नी विरोधात पतीने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!