April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूरच्या एका वाहतूक शिपायाने कर्तव्यावर असताना पोलिसातील माणुसकीचा परिचय दिला आहे.

एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे हे समजताच चंद्रपुर वाहतूक पोलीसात कार्यरत असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यानी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे.

समीर चापले असे या वाहतूक शिपायाचे नाव असून त्यांनी कर्तव्यावर असताना एका गरजू रुग्णाला तात्काळ रक्तदान केले. समीर चापले हे रविवारी दुपारी 12 वाजताच्या वाहतूक कार्याल समोर नाक बंदी कारत आसतणी सरकारी हॉस्पिटल मधून अचानक फोन आला की तुम्हच ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह असल्याने आणि ते आता भेटत नसल्याने व त्यांना ओ नेगेटिव्ह ब्लड ची अत्यंत गरज असल्याने तुम्ही ब्लड देऊ शकता का? असे विचारण्यात आले असता तसाच तो ट्राफिक वर्दीवर सरकारी हॉस्पिटल चंद्रपूर येथे जाऊन निमोनिया पेशंट किरण लोडल्लीवार वय 48 ह्यांना ब्लड donate केले या एका निमोनिया पेशंट असलेल्या महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी समीर चापले यांना सांगितले.त्यांनी क्षणाचाही विलंब न आपल्या कर्तव्य स्थानावर एका साथीदार पोलीस कर्मचाऱ्याची मदत घेत लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. व पोलिसातील माणुसकीचे जिवंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले.

समीर चापले यांनी रक्त दिल्याने गंभीर स्थिती टळून त्या गरजू महिलेला उपचार मिळाले.व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.विशेष म्हणजे या पोलिसाने वर्दीवर असतांना रक्तदान केले. त्यांच्या या कार्याने निस्वार्थ सेवा संस्थेच्या लोकांनी त्यांचे आभार मानले. समीर चापले यांनी केलेल्या कार्यामुळे त्याच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisements
error: Content is protected !!