
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला 250 पीपीई किट उपलब्ध करून दिले असून या माध्यमातुन कोरोनाच्या विरोधात लढा लढताना सुरू असलेल्या सेवाकार्यात भर घातली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग प्रयत्नांची शर्थ करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांचया फलस्वरूप चंद्रपूर जिल्हयात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळलेला नाही. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सॅनिटायझर वितरीत केले असून त्यांच्या माध्यमातुन मास्क व डेटॉल साबणचे वितरण नागरिकांमध्ये केले जात आहे. श्रीराम धान्य प्रसाद अर्थात जीवनावश्यक वस्तुंच्या किटस वितरण व गरीब, गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था केली जात आहे. रूग्णांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था सुध्दा रूग्णालयांमध्ये त्यांनी उपलब्ध केली आहे. अशा पध्दतीने सुरू असलेल्या सेवाकार्यात जिल्हा प्रशासनाला 250 पीपीई किट पुरवून त्यांनी भर घातली आहे.महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावड़े , मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे , जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे , डॉ मंगेश गुलवाड़े यांची उपस्थिति होती.
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद