April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही !

(चंद्रपूर प्रतिनिधी) : आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याच्या अफवेचा पिऊ फुटला होता परंतु ती अफवा असून त्यात तथ्य नाही. covid-19 संदर्भात कोणतीही माहिती शासकीय असेल तर त्याला गृहीत धरावे अन्यथा अफवा पसरू नये असे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. काही news चॅनेल आता दाखवीत असलेली आकडेवारी ही मूल येथील इंडोनेशिया रिटर्न ज्यांना नागपूर आमदार निवास वर थांबविण्यात आले होते, त्यांचा मूळ पत्ता आपल्या जिल्ह्यातील असल्याने व ते नागपूर ला टेम्पररी थांबून असल्याने सर्व ठिकाणी पत्ता चंद्रपूर उल्लेख येत असल्यामुळे यादीत असा गोंधळ होत असल्याची विश्वसनिय माहिती आहे.

महत्त्वाचे म्हणजे एका प्रादेशिक चॅनलवर नुकतेच आज चंद्रपुरात रुग्ण मिळाल्याची बातमी प्रकाशित झाली त्यासोबतच शासनाच्या साइटवर कम्फर्ट रुग्ण म्हणून चंद्रपूर येथे एक प्लस दाखविण्यात येत होते त्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण पासून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात आली परंतु त्यात काही तथ्य नाही व ती बातमी खोटी आहे असा मजकूर लिहिलेला मेसेज जिल्हाधिकारी यांनी स्वतः प्रतिनिधींना पाठवल्यामुळे अफवेवर विश्वास न ठेवता कुणीही घाबरू नये. चंद्रपुरात कुणीही रुग्णांनाही शासनाने दिलेल्या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी एबीपी  माझा वर झळकताच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमधे भिती निर्माण झाली असून जो तो आपल्या जिल्ह्यातील तो कोरोना रुग्ण कोण ? तो कुठे आहे ? त्याला खरंच कोरोना झाला कां ? याबाबत नागरिक चर्चा करतांना दिसत असून अलिकडेच  चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्यामुळे काही बाबतीत जिल्ह्यात संचारबंदीमधे स्थितिलता आणू अशी घोषणा केली होती, मात्र एबीपी  माझा च्या या बातमीमुळे प्रशासन सुद्धा खळवळून जाग झालं मात्र जिल्हाधिकारी किंव्हा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तर्फे या बातमीला दुजोरा अजूनपर्यंत दिला गेला नाही, एवढेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात चौकशी केली असता असा कुठलाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भरती नसल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणीतून समोर आले आहे.

शासकीय साइटवर आलेली माहिती ही वेगळ्या आशयाची  असल्वायामूळे व वाहिन्यांवर आलेले वृत्त अपूर्या माहितीच्या आधारे देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!