April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

परीट .धोबी. समाजाला शासनाने आर्थिक साहाय्य द्यावे

माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक मा. बावनकुळे जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी पत्र पाठवून केली मागणी केली आहे

महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक चे संस्थापक अध्यक्ष मा. . डी. डी. सोनटक्के यांनी मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांना समाज संघटनेच्या वतीने केली होती विनंती..

राज्यात दीड लाखावर असलेला आपला परीट धोबी समाज कोरोना लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्या समाजाचा इस्त्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. आपल्या समाजाला शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे याकरिता महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक चे संस्थापक अध्यक्ष मा. डी. डी. सोनटक्के यांनी गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील संपूर्ण धोबी समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले होते व आपल्या समाजाला शासनाकडून मदत मिळालीच पाहिजे याकरता महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक च्या वतीने वारंवार पाठपुरावा चालू आहे. या अनुशंगाने राज्याचे *माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे राज्याचे मुख्य समन्वयक* मा.  चंद्रशेखर बावनकुळे यांनाही त्यांनी आपल्या समाजाची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडावी याकरता बावनकुळे साहेबांना धोबी महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. *डी. डी. सोनटक्के साहेब* यांनी पत्र दिले होते यावरून बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवले संपूर्ण देशात कोरोनामुळे संचारबंदी असल्यामुळे धोबी समाजातील लहान व मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी धोबी समाजाच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. लॉंड्री व्यावसायिकांना दुकानभाडे, घरभाडे, लाईट बिल भरणे कठीण झाले आहे यामुळे या समाजाच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली, परीट समाजातील व्यावसायिकांना 3 महिन्याचे वीज बिल माफ करावे, तीन महिन्याचे घर भाडे व दुकान भाडे माफ करावे, 3 महिन्यासाठी मासिक 5 हजार रुपये भत्ता देण्यात यावा तसेच व्यवसायासाठी 25 हजार रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात यावे इ. समाजाच्या मागण्या आहेत.

Advertisements
error: Content is protected !!