April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

एक युवक रेल्वे वॅगन मध्ये चढून कोळसा काढत असताना याचा करंट लागुन जागीच मृत्यू घुग्गुस परिसरातील घटना

शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील नवीन वेकोली कोळसा स्टॉक सायडिंग वर आज दिनांक 15 एप्रिल सकाळी एक युवक रेल्वे वॅगन मध्ये चढून कोळसा काढत असताना त्याचा स्पर्श हाय व्होल्टेज वीज ताराला झाल्याने, विजेच्या प्रचंड धक्क्याने भाजल्या जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ आहे.

परिसरातील काही युवक दररोज रात्री व सकाळच्या सुमारास या कोल सायडिंग वर दररोज उभ्या असलेल्या वॅगन मधून कोळसा काढून त्याची काळ्या बाजारात विक्री करतात. आपली उपजीविका भागविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोळसा काढण्याची जीवघेनी कसरत आज मात्र ही कसरत युवकांच्या जीवावर बेतली.

काही कोल माफियांनी सुद्धा याप्रकारे दररोज कोळसा काढून बाजारात खुली विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला असून याकरिता बाहेर राज्यातून सुद्धा मजूर आणले जात असल्याची परिसरात चर्चा आहे. सदर अपघात ग्रस्त युवक पूर्णपणे भाजला गेला असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.ही घटना रेल्वे पोलीस विभागाच्या ताडाळी पोस्ट च्या अखत्यारीत येत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.

Advertisements
error: Content is protected !!