
राज्य-देश व जगात हाहाकार माजविलेला कोरोना साथरोग चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करू शकलेला नाही. अद्याप चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त आहे. प्रारंभीच्या काळात प्रशासन व पोलिस यंत्रणेने केलेल्या नियोजन पूर्ण कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. आगामी काळातही हीच स्थिती कायम रहावी यासाठी यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. बल्लारशा शहरातील प्रमुख गर्दीच्या परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.बल्लारशा रस्त्यावर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत आहेत. मात्र घनदाट वस्तीच्या भागात नागरिक गप्पागोष्टी करण्यासाठी गर्दी करून असल्याची माहिती ती यंत्रणांना मिळत होती. नागरिकांना कोरोनाबाबत सतर्क करण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च हाती घेत संपूर्ण परिसर पिंजून काढला. शहरातील प्रमुख भागात हा रूट मार्च फिरल्यानंतर रस्त्यांवर शुकशुकाट नजरेस पडला. आपण घरातच सुरक्षित राहावे -आम्ही आपल्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत असा संदेश पोलिसांनी कोरोना मुक्तीच्या लढ्यात दिला…
पुलिस निरीक्षक भगत सहाय्यक पोलिस निरीक्षक गोंधके सहाय्यक पोलिस निरीक्षक जोशी सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड
सिंडमा विजय मुके राकेश बंजारीवले नायडू निलेेश माळवे .बल्लारशा शहरात पोलीस डिपार्टमेंट चे अधिकारी व कर्मचारी.रूट मार्च काढून उपस्थित होते
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई