April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

खबरदारी म्हणून करण्यात आले कडेकोट सिलबंद चंद्रपुरातील खिडक्या व काही मुख्य रस्ते

संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा परिणाम, चंद्रपुरकरांनी घरातच राहून लॉकडाऊनचा पाळावा

चंद्रपुर : कोरोना च्या भयावह स्थितीवर नियंत्रणासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. चंद्रपुरसह विदर्भातील चार जिल्ह्यामध्ये एक ही रूग्ण आढळला नसल्यामुळे राज्याच्या ग्रीन झोन मध्ये चंद्रपूर आहे. नुकतेच आणखी 30 तारखेपर्यंत खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा वाढविण्यात आला आहे. संचारबंदी कायम असतांनाही आता काही होत नाही या थाटात तरूण वर्ग बाहेर हूंडकळतांना दिसत आहे यावर नियंत्रणासाठी म्हणुन आजपासून शहरातील हनुमान, चोरखिडकी, बगड खिडकी व विठोबाखिडकी या चार ही खिडक्या व काही मुख्य रस्ते आज खबरदारी म्हणून कडेकोड बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी धोका टळला असे न समजता, कोरोनाच्या धोक्याला ओळखून घरीच रहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Advertisements
error: Content is protected !!