April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन केली तयार

पोलिसांच्या निर्जंतुकीकरणासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार

संचारबदीत सर्वाधिक महत्वाची भूमिका पोलिस बजावत आहे.शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ठाणे आणि नाकाबंदी अशा दोन स्तरावर पोलिसांचे काम सुरू आहे.या दरम्यान त्यांचा हजारो लोकांशी संपर्क येतो.मात्र या कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करण्याचे प्रभावी साधन आतापर्यंत उपलब्ध नव्हते.त्यांना पारंपरिक पद्धतीचाच वापर करावा लागत होता.आता मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे.बंदोबस्त आणि कर्तव्यावर असलेला प्रत्येक पोलिसांचे निजंर्तुकीकरण यामुळे होणार आहे.सध्या कोरानाच्या वादळाने सारेच हादरले आहे. त्यांचा संसर्ग थांबविण्यासाठी मसोशल डिस्टन्सिंगम हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मात्र नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे,यासाठी दिवस रात्र पोलिस प्रयत्न करीत आहे. मात्र हे करताना अनेकदा त्यांचा नागरिकांनी थेट संबंध येतो.विशेषतः बंदोबस्त असलेले आणि ठाण्यात कार्यरत पोलिसांना सोशल डिस्टन्सिंगम पाळणे कठीण होत आहे. यापाश्र्वभूमीवर त्यांना कोरानाची लागण होण्याची भीती सतावत असते.मात्र आता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यावर वेग़ळा तोडगा काढला. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून सॅनिटायाझर व्हॅन तयार केली आहे.ही व्हॅन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून सर्व पोलिस ठाणे आणि नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाते.तेथील पोलिस कर्मचारी व्हॅनमध्ये एक एकटे जातात. या व्हॅन मध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारे लावले आहे.विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य या फवाऱ्यातून सोडले जाते. पोलिस कर्मचारी आता गेला की व्हॅनमधील कर्मचारी बटन सुरू करतो. त्यानंतर फवारे सुरू होतात आणि आतील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडतात. अशा तर्हेने डोक्यापासून तर पायापर्यंत त्या कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

Advertisements
error: Content is protected !!