April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

अजयपुर गावात तेरवीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 40 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावर अजयपूर येथे अन्नातून विषबाधा, एका घरी तेरवीच्या जेवणाचे गावाला होते निमंत्रण, सकाळी झालेल्या जेवणानंतर सुमारे 40 व्यक्तींना मळमळ- उलट्या, जवळच्या चिचपल्ली येथील प्रा. आ. केंद्रात आणले गेले बाधित लोक, डॉक्टर-परिचारिका करत आहेत शर्थीचे प्रयत्न, काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात केले जात आहे रवाना

राज्य देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना ग्रामीण भागात यातून कुठलाही बोध घेतला जात नसल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात पुढे आले आहे. चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपुर गावात तेरवीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 40 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी अजयपुर येथील पोलिस पाटलाच्या घरी हे तेरवीचे जेवण होते. यासाठी गावाला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र दुपारपासून जेवण केलेल्या लोकांना मळमळ उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला. रूग्ण वाढल्याने जवळच्या चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लोक हलवण्यात आले. तर रात्री उशिरापर्यंत रुग्णांची आरोग्य केंद्रातील भरती सुरूच असल्याने काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान देश लॉकडाऊन असताना सामाजिक दूरता पाळायची आहे. धार्मिक विधी -कार्यक्रम यावर बंदी असताना कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस पाटलाच्या घरीच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान चिचपल्ली येथे डॉक्टरांचे चमू रवाना झाली असून स्थानिक परिचारिका व डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत.

Advertisements
error: Content is protected !!