April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

संचारबंदीचे उल्लंघन करणारे झाले ‘कोरोना किंग’,चंद्रपूर  पोलिसांनी आरती ओवाळू व हार, टिका लावून केला सत्कार

 

चंद्रपूर : वारंवार विनंती, आवाहन करूनही काहींचे विनाकारण घराबाहेर निघणे सुरूच आहे. अशा लोकांवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करीत ‘कोरोना किंग’ घोषित केले. एवढेच नाही तर अशा लोकांचा हार आणि टीका लावून सत्कार करण्यात आला. या कारवाईची चर्चा सर्वत्र होत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात 21 दिवसांची संचारबंदी घोषित करण्यात आली. आता ही संचारबंदी आणखी दोन आठवडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि तातडीच्या सेवांसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा असताना काही लोक कुठलेही निमित्त, कारण नसताना जिल्ह्यात मुक्तसंचार करताना दिसत आहे. यावर अनेक आवाहने केल्यावरही काही लोकांवर याचा परिणाम झाला नाही. अशा लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा चंद्रपूर पोलिसांनी लावला आहे. जर लोक बाहेर फिरत दिसणार अशांवर संचारबंदीची कारवाई करण्यात येत आहे. सोबत त्यांच्या गळ्यात हार टाकून आणि टीका लावून त्यांना कोरोना किंग म्हणत सत्कार करण्यात आला. “आपण कोरोनाच्या काळात बाहेर पडलात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, म्हणून आपला सत्कार करण्यात येत असल्याचे” सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Advertisements
error: Content is protected !!