
( भद्रावती प्रतिनिधी) सध्या राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या जिवाची परवा न करता प्रशासकीय सेवेतील पोलीस, वैद्यकीय, पालिका व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाचे रान करीत आहे. या सर्वांना सलाम म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा प्रदेश प्रतिनिधी मुननाज शेख यांनी आपला वाढदिवस या सर्व अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. मुनाज शेख यांचा 11 एप्रिल ला वाढदिवस साजरा करण्यात आला या दिवशी नगराध्यक्ष अनिल धानोरकर तहसीलदार महेश शितोळे ,नायब तहसिलदार मधुकर काळे,ठाणेदार सुनिलसिंग पवार व पोलीस निरिक्षक,पोलीस शिपाई ,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नितीन सातभाई ,प्रर्यगाशाळा प्रमुख लांडे साहेब,याचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन मुनाज शेख यांच्यावतीने सत्कार करण्यात आला, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अगदी प्रतिकूल परिस्थितीत या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे आभार मुनाज शेख यांनी मानले। यावेळी सबिया देवगडे, इजाज अली, रोशन कोमरेडीवार, निलेश जगताप, इरफान कुरेशी अफजल शेख आदींची उपस्थिती होती.
More Stories
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार
गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
भद्रावती शहरातील एक दारु चकना फ्री अवैध दारू विक्रेत्यांन मध्ये स्पर्धा सुरू आहे.