April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

खर्रा विकणाऱ्या वाल्याच्या मुसक्‍या आवळल्या राम नगर पोलिसांनी तिघिला केली अटक

 

चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी खर्याची विक्री सुरू आहे. अशी विक्री आणि खरेदी करणाऱ्यावर रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर भादवी कलम 188 69 270 271 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सर्व देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा संसर्ग पसरू नये यासाठी तत्काळ सुविधा वगळता लोकांना घराबाहेर न पडण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही काही नागरिकांचे घराबाहेर पडणे सुरूच आहे. विशेष म्हणजे आपले शौक पुरे करण्यासाठी ते आपला आणि दुसऱ्यांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. चंद्रपुरात तंबाखु, सुपारी आणि चुण्यापासून तयार केला जाणार खर्रा हा प्रसिद्ध आहे. याची मोठी मागणी जिल्ह्यात सर्वत्र आहे. त्यामूळे अनेक जण आपला खर्याचा शौक पुरा करण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांच्या मागणीनुसार खर्रा विकण्यात देखील येत आहे. आज रामनगर पोलिसांनी अश्यावर ही करवाई पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाल सहाय्यक पोलिस निरीक्षक दरेकर,सुधीर जाधव,  मनोहर कामडी माजीद खा पठाण कारवाई केली.

Advertisements
error: Content is protected !!