April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

संचारबंदी व लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द गुन्हे दाखल

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला असुन कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, संपुर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्हयात या कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संचारबंदी व लॉकडाउन आदेश निर्गमित केले होते.

असे  असतांना सुध्दा बरेच नागरीक सदर संचारबंदी व लॉकडाउन आदेशाचे उल्लघंन करुन रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळुन आल्याने दिनांक १९ मार्च, २०२० ते ०९ एप्रिल, २०२० पावेतो जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे संचारबंदी व लॉकडाउन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ९६ गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये ३५ आरोपीतांना अटक, २१५ वाहने जप्त आणि एकुण ४,४२,४००/-रू दड वसुल करण्यात आला आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्हयात कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी व लॉकडाउन नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच पोलीसांना सहकार्य करावे. संचारबंदी लॉकडाउन उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Advertisements
error: Content is protected !!