April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी चंद्रपुर जिल्हा भाजपातर्फे पिएम केअर फंडात निधी जमा करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे 

भाजपाच्या स्थापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विरुद्धच्या लढ्यात पिएम केअर फंडात निधी जमा करुन आपले योगदान देण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी पुढे सरसावले आहेत.
लाॅकडाऊन मुळे ठिकठिकाणी अडलेल्यांना मदत करणे, गोरगरीब जनतेला किराणा व जिवनोपयोगी वस्तुंच्या कीट्सचा पुरवठा करणे , भुकेल्यांना अन्नदान करणे यासाठी भाजपा नेते माजी अर्थमंत्री आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांचे नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यातील भाजपाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टेन्सिंगची मर्यादा पाळत मदतीसाठी ठिकठिकाणी पुढे येऊन कार्यरत आहेत व प्रशासनालाही योग्य सहकार्य करीत आहेत. येत्या काळात रक्तदान शिबिरे सुध्दा आयोजित करुन रक्त संकलित केल्या जाणार आहे.
मदतकार्य व निधी संकलनासाठी भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा , चिमुरचे आमदार बंटीभाऊ भांगडिया , जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले, चंद्रपुर मनपाच्या महापौर सौ.राखीताई कंचर्लावार , माजी आम. प्रा.अतुलभाऊ देशकर , माजी आम. ॲड.संजय धोटे , माजी आम.जैन्नुद्दीन जव्हेरी, माजी आम.सुदर्शन निमकर, भाजपा नेते विजय राऊत , जि.प.गटनेते देवराव भोंगळे , भाजपा नेते प्रमोद कडु , राजेंद्र गांधी , खुशाल बोंडे , चंद्रपुर मनपा गटनेता वसंता देशमुख , भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.वनिताताई कानडे व जिल्हा अध्यक्षा सौ. रेणुकाताई दुधे , जि.प.उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर , वरोरा चे नगराध्यक्ष अहतेशाम अली, मुल च्या नगराध्यक्षा सौ.रत्नमालाताई भोयर, नागभीडचे नगराध्यक्ष प्रा.डाॅ.उमाजी हिरे, पोंभुर्णा च्या नगराध्यक्षा सौ.श्वेताताई वनकर यांच्या नेतृत्त्वात विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
निधी संकलनासाठी चंद्रपुर ग्रामिण जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे तसेच चंद्रपुर महानगराची भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे व उपमहापौर राहुल पावडे यांचेकडे देण्यात आली आहे. यासोबतच पिएम केअर फंडात निधी जमा करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर भाजपाअध्यक्षांच्या मार्फत काम सुरु झाले आहे.
या आवाहनानुसार भाजपा जिल्हाध्यक्ष व बल्लारपुर न.प.अध्यक्ष हरिष शर्मा यांनी २१ हजार रु. , दुर्गापुर च्या जि.प.सदस्या सौ.वनिताताई आसुटकर यांनी २१ हजार रु. , युवा कार्यकर्ता रामपालसिंह यांनी १ लक्ष २० हजार रु. , बल्लारपुरचे नगरसेवक शिवचंद द्विवेदी यांनी ११ हजार रु., राजुरा चे नगरसेवक राधेश्याम अदानिया यांनी ११ हजार रु. चेकद्वारा जमा केले आहेत.
नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके यांनी तालुक्यातुन किमान २ लक्ष रु. जमा करण्याचा संकल्प केला असुन प्रत्येक गावातुन कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन किमान २ हजार रु. चे संकलन करीत आतापर्यंत १ लक्ष २० हजार रु. जमा केलेले आहेत .
सर्वांनीच गोरगरीबांसाठीचे हे सेवाकार्य सुरु ठेवत कोरोना विरुद्ध लढ्यासाठी पिएम केअर फंडात निधी जमा करण्यासाठी भाजपाचे जि.प.सभापती व सदस्य, न.प.चे नगराध्यक्ष व नगरसेवक, पं.स.सभापती व सदस्य, सर्व आघाड्यांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांनी यथाशक्ती योगदान देण्याची विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा , जिल्हा महामंत्री देवराव भोंगळे, संजय गजपुरे , राहुल सराफ व हिरामणजी खोब्रागडे तसेच चंद्रपुरचे उपमहापौर राहुल पावडे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे यांनी केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!