
25 मार्चला तुकूम परिसरातील एका मशीदीमध्ये अकरा तुर्कीरकीस्तानी नागरिक व देशातील विविध शहरातून (दिल्ली व ओडिसा -1) अश्या एकूण 13 व्यक्ती लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे व्हिसा असल्याकारणाने त्यांना सोडून देण्यात आले होते.
परंतु आता प्रशासनाला आल्याची माहिती दिली नाही व त्यांच्याकडे असलेला व्हिसा हा पर्यटनासाठी होता व धार्मिक कार्यक्रमात सामील होण्याची कोणतीही परवानगी तपासणीत समोर आली आले. मात्र ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर आज बुधवार शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विदेशी नागरिक अधिनियम कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चंद्रपूरातील तुकुम तलाव येथील एका मशीदीमध्ये तब्बल 11 तुर्कीस्तानी व 2 भारतीय असे 13 मौलवी 22 दिवसांपासून होते. 25 मार्च रोजी ही बाब उजेडात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीत 11 तुर्कीस्तानी मौलवींकडून व्हिसाचा गैरवापर झाल्याची बाब समोर येताच त्यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियम कायद्यांतर्गत188, 269, 270, 14bi, 14, सि, 7 सि, 2 अन्वये गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे. या सर्व 13 ही मौलवींना सध्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहेत. 14 दिवसांचा कालावधी संपताच त्यांच्यावर पुढील कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
25 मार्च रोजी 13 मौलवी 22 दिवसांपासून तुकुम येथील एका मशीदीत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या आधारे पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने मशीद गाठून या मौलवींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यामध्ये 11 तुर्कीस्तानी आणि दिल्ली व आसाम येथील प्रत्येकी एका मौलवीचा समावेश होता. हे मौलवी तुर्कीस्तानातून कोणत्या हेतूने चंद्रपूरात आले, याचा उगलडा अद्याप झालेला नसल्याचे पोलिसांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यांच्याकडे व्हिसा असल्याने त्यांच्यावर त्यावेळी कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नव्हती. परंतु प्रकरण तपासात होते. अधिक तपासात 11 तुर्कीस्तानी मौलवींना मिळालेला व्हिसा हा पर्यटनासाठीचा होता.
असे असताना ही मंडळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. ही धक्कादायक बाब सखोल चौकशीत निष्पन्न होताच शहर पोलीस ठाण्यात 11 तुर्कीस्तानी मौलवींविरुद्ध व्हिसाचा गैरवापर केल्याप्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी सांगितले.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे