April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

जिल्हाधिकाऱ्यांनी आपलाच आदेश फिरवला, संचारबंदीत जीवनावश्यक दुकानेच राहील सुरू ..

जिल्हाधिकारी चंद्रपूर आदेशान्वये, चंद्रपूर जिल्हयातील जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण (भाजीपाला किराणा सामान/ दुध/ ब्रेड/ फळे/ अंडी/मांस/ मत्स्य/ बेकरी/ पशु खाद्यांची दुकाने/ इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल्स गुडस/स्टेशनरी व जनरल गुडस/ हार्डवेअर/ कापड दुकाने व लाँड्री) इत्यादी प्रकारच्या सर्व आस्थापना/ दुकाने दिनांक 07.04.2020 ते दिनांक 14.04.2020 या कालावधीत आदेशान्वये ठरवुन देण्यात आलेल्या दिवशी, वेळेत सुरु ठेवण्याकरिता काही शर्ती व अटीवर परवानगी प्रदान करण्यात आलेली होती.

परंतु नागरीकांकडून अनावश्यक गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर (Social Distancing) काटेकोरपणे पालन होत नसल्याने या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

1. जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण जसे भाजीपाला/किराणा सामान/दुध/ब्रेड/फळे/ अंडी/मांस/मत्स्य/बेकरी/पशु खाद्यांची दुकाने) या सर्व आस्थापना/दुकाने दररोज सकाळी 07.00 ते

दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील.

परंतु या आदेशातील अ. क्र. 2 ते 5 :

2. इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स गुडस व मोबाईल विक्री/वितरण व दुरुस्ती इत्यादी आस्थापना/ दुकाने,

3. स्टेशनरी व जनरल गुडस वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने.

4. हार्डवेअर संबधीत वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने.

5. कापड दुकाने वस्तु विक्री व वितरण तसेच लाँड्री इत्यादी आस्थापना/दुकाने.

 

सुरु करण्यासाठी नेमुन दिलेले दिवस व वेळ याव्दारे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.

 

Advertisements
error: Content is protected !!