April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

39 वर्षीय चंद्रपूर येथील असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला 

चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी असलेला एक व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह सापडला आहे. तरीही त्याला नागपूर येथेच ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही.

थोडक्यात माहिती नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी असलेला एक व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह असून तो इंडोनेशिया येथून भारतात दिल्ली येथे परतला होता. दिल्ली वरून चंद्रपूर येथे पोहोचत असतानाच नागपूर विमातळावर लॉकडाऊन पूर्वीच त्याला विदेश प्रवास व प्राथमिक लक्षणें असल्याने आमदार निवारा नागपूर येथे विलगीकरणात(quarantine)क्वॉरन्टीन् ठेवण्यात आले होते.

आता त्रास वाढल्याने तपासणी अंती कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहित जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली असून त्या रुग्णाचा चंद्रपूर जिल्ह्यात शिरकावच झाला नसल्याने घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे नागरिकनकाळविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा नागरिक असणारा एक व्यक्ती विदेशातून आल्यापासून नागपूरला इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन होता. तो चंद्रपूरमध्ये आलाच नाही. सदर व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचा सध्या चंद्रपूरशी संबध नाही : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

Advertisements
error: Content is protected !!