April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

ब्रम्हपुरी शहरातील दोन मेडिकल स्टोर्सवर कारवाई करण्यात आली

 ५० हजार रु. दंड ब्रम्हपुरी च्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी ठोठावला आहे.

जागतिक स्तरावर कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे हजारो लोक मरण पावत आहेत. अनेक प्रगत देश सुध्दा या रोगामुळे हतबल झाले आहेत. आपल्या देशात सुध्दा या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुर्णतः देशभर लाँकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये बाकिची दुकाने वगळता जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने काही अटि व शर्तीचे पालन करुन सुरू ठेवण्यास परवानगी आहे. 

परंतु प्रशासनाने दिलेल्या अटि व शर्ती चे पालन न करता मेडीकल स्टोर्स चालवणार्‍या ब्रम्हपुरी शहरातील दोन मेडिकल स्टोर्सवर कारवाई करण्यात आली असुन केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन चा कालावधी वाढविल्यास सदरच्या वाढविलेल्या कालावधी पर्यंत शासनाने सांगितलेल्या अटिंचे तंतोतंत पालन करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

अन्यथा औषधालयाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्तावित करण्यात येईल याबाबत समज देखील देण्यात आले आहे. तसेच  ५० हजार रु. दंड ब्रम्हपुरी च्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी ठोठावला आहे.

केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी वेळोवेळी निर्देश व सुचना निर्गमित केल्या आहेत. सोबत स्थानिक नगरपरिषदेने सुद्धा ध्वनीक्षेपकाद्वारे दुकान सुरु ठेवतांनाच्या शर्ती व अटिबाबत सुचना देऊन अवगत केले आहे.

तरी सुध्दा ब्रम्हपुरी येथील शिवाजी महाराज चौकातील वसीमा सय्यद यांच्या मालकीची वसीमा मेडीकल स्टोर्स व उत्तम बनकर यांच्या मालकीची शुभम मेडीकल स्टोर्स यांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती,व सेवांची योग्य जाणीव असतांना देखील त्या दोन्ही मेडिकल समोर ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता सोशल डिस्टंस नियमांचे उल्लंघन, त्यामुळे काउंटरवर एकाचवेळी ग्राहकांची गर्दी जमा असल्याचे नगरपरिषद पथकाच्या मौका तपासणीत आढळून आले. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements
error: Content is protected !!