
देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनही दररोज जनतेला घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत. असे असताना शहरातील रस्त्यांवर दुचाकीस्वारांची गर्दी बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातील नाकाबंदी आणखी कडक केली आहे. चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या नागपूर मार्गावर वडगाव, मूलकडून येणाºया मार्गावरील बंगाली कॅम्प या शिवाय रामनगर पोलीस ठाणे, जटपुरा गेट येथील नाक्यावर वाहनधारकांना अडवून विनाकामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र यात काही प्रमाणात शिथिलता होती. मात्र नागरिकांचे बाहेर निघण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे नाके आता कडक झाले आहेत. बुधवारी प्रियदर्शिनी चौकालगत शहरातून येणाऱ्या मार्गावर नव्याने नाकाबंदी केली आहे.
रिकामटेकड्यांना बेशरम झाडाचा गुलदस्ता
लॉकडाऊन असताना विनाकारण दुचाकीने फिरणाºया रिकामटेकड्या युवकांना घुग्गुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी बेशरम झाडाचे गुलदस्ते देऊन सत्कार केला. यापुढे घराबाहेर निघाल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली. संचारबंदी दरम्यान शहरातील ९ दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली.’
पासेसशिवाय दुचाकी बाहेर काढल्यास कडक कारवाई
जिल्हा प्रशासनाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या बाहेर पडायला लागल्यामुळे नागरिकांना आता दुचाकी गाडी चालविण्यासाठी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाºया नागरिकांनाच फक्त संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांकडून पासेसवर परवानगी मिळणार आहे. त्यामुळे घराबाहेर दुचाकी घेऊन निघाल्यास कारवाई होणार आहे.
Advertisements
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद