
लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. संकटात अडकलेल्या अनेकांना भोजन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. अशा मंडळींना आता सहजपणे जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारपासून शिवभोजनाची थाळी ‘पॅकेट्स’ मधून देणे सुरू केले.
शासनाकडून शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रूपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रूपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता नागरिकांना केवळ पाच रूपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंतन भोजन उपलब्ध होणार आहे.शासनाने थाळी ऐवजी आता शिवभोजन पॅकेट्स स्वरूपात विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
संचारबंदीमुळे अनेकांसमोर भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. अशा संकटात सापडलेल्या व्यक्तींना सहजपणे भोजन मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. भोजन ‘पॅकेट्स’ मधून मिळणार असून वेळही वाढविण्यात आली.- राजेंद्र मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर
भोजनालयात पाळा सोशल डिस्टन्सिंग :
शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध द्यावे. तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भोजनालय चालकांनी जेवण तयार करण्याआधी हात कमीतकमी २० सेकंद साबणाने स्वच्छ करावे. शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करावे. भोजन तयार करणारे तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावे, भोजनालयातील कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई