
मालेगांंव प्रतिनिधी: मालेगांंव गावातील वाद गावातच निपटारा व्हावा यां उदात्त हेतूने शासनाने पोलीस प्रशासनाचे दुत म्हणून पोलीस पाटलाची नियुक्ती केली. मात्र प्रकरणाचा निपटारा करण्या ऐवजी वसंतनगर येथील पोलीस पाटलांनी शाब्दिक वाद विकोपाला नेऊन गर्भवती महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना (ता३०)ला वसंतनगर येथे घडली. पिडीत महिला नऊ महिण्याची गर्भवती असल्याने तिला यवतमाळ येथे हलविण्यात आले. परिणामी पोलीस पाटलां विरुद्ध मारेगांव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील वसंतनगर येथील अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवरून पोलीस पाटील रामराव राठोड यांचे मोठे बंधू राजु राठोड व शंकर राठोड सह पत्नी यांचेत शाब्दिक खडाजंगी सुरू असताना कुठलीही बाजु समजावून न घेता पोलीस पाटील रामलाल शामा राठोड (३५) शंकर राठोड यांची पत्नी सिमा हिला बेदम मारहान केली. सदर पिडीत महिला ही नऊ महिण्याची गर्भवती असल्याने बेदम मारहाणीत निपचित पडली. तीला लगेच मारेगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या नंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. सामाजिक भान व आपले कर्तव्य. विसलेल्या पोलीस पाटील रामराव राठोड यांचे विरोधात पिडितीचे पती शंकर राठोड यांनी मारेगांव पोलीसात तक्रार दाखल केली असुन वृत्त लिहिपर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई