
महाविद्यालय येथील फी जमा करण्याची मुदत वाढवून द्यावी .मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
देशातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे सर्वत्र लोक डॉन जाहीर करण्यात आले आहे. तसेच शासनाद्वारे संपूर्ण राज्यात दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत बंदी लागू करण्यात आल्याने, सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना मूळे लोक डॉन मध्ये पुढे वाढ होणेसुध्दा नाकारता येत नाही,तसेच कोविड-१९ कोरोना या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने व व्यवसाय बंद असल्याने, सर्व मध्यमवर्गीय व गरीब कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
राज्यातील सध्याची परिस्थिती व संपूर्ण बंदी मुळे पैश्याची उपलब्धता नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे, या बंदीच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय, खाजगी शाळा तसेच सर्व महाविद्यालय यांनी पालका कडून मार्च, एप्रिल व मे महिन्याची सरसकट फी माफ करावी व ज्या पालकांनी अद्याप खाजगी शाळा व महाविद्यालयांची सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या चालू वर्षाची फी जमा केलेली नाही अश्या पालकांना फी जमा करण्याकरिता पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी तसेच पुढील सहा महिने सदर फी जमा करण्याकरिता व्यवस्थापन किंवा शाळांकडून सक्ती करण्यात येऊ नये याबाबत निर्देश काढावेत व तशी तक्रार आल्यास आपण कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या निवेदान्द्वारे करण्यात आली आहे.
या बंदीच्या काळात हा निर्देश शासनाने काढल्यास आर्थिक अडचणीत सापडलेला पालकांना दिलासा मिळणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
Advertisements
More Stories
मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे
प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास घट्ट ठेवा: डॉ. कुणाल खेमनार
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात जन विकास सेनेचे आंदोलन उद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन करणार