April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

वाहतुक पोलिसांची अशीही समाजसेवा, वृध्द दांपत्यास स्वतःचा जेवणाचा डब्बा देऊन घरी जाण्यासाठी पण केली व्यवस्था !

एकीकडे संचारबंदीमधे पोलिसांकडून सर्वसामान्यांना दंडे खावे लागत असल्याचे प्रकार समोर येत असतांनाच दुसरीकडे मात्र हेच पोलिस आपले शासकीय कर्तव्यासोबतच समाजसेवा पण करतात तेंव्हा असं वाटायला लागते की पोलिस केवळ आपले रक्षकच नाही तर संकटात ते आपले मित्र आणि जवळचे असतात. अशीच एक ह्रूदयाला पाझर फोडणारी घटना प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक चंद्रपूर येथे घडली, वाहतूक पोलिस शिपाई राजू अरवेलीवार आणि रवींद्र लेनगुरे हे कर्तव्यावर असतांना त्यांना एक व्रूद्ध दांपत्य प्रियदर्शनी चौकात भेटले, ते गाडीच्या शोधात होते आणि उन्हात त्यांच्या जीवाची लाही लाही होतं होती, त्यामुळे व्यथित झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळ बोलवले व त्यांना भूक लागली याची जान होताच त्यांना स्वतःच्या जवळचा खाण्याचा डब्बा त्यांना देवून जेवन करायला लावले व ऑटोमधे बसवून त्यांना त्यांच्या घरी पोहचवीण्याची व्यवस्था केली.

संचारबंदी असतांना पोलिस एकीकडे रस्त्यावर फिरणाऱ्याना मारतात अशी चर्चा असतांनाच असेही पोलिस असतात जे एका व्रुद्ध जोडप्याला जेवन देवून मौज वाघेडा ता. भद्रावती या त्यांच्या स्वतःच्या गावाला पोहचवूण देतात म्हणजे पोलिसांत माणुसकीचे दर्शन झाले असे चित्र त्या व्रूद्ध जोडप्याच्या डोळ्यासमोर दिसत असेल.त्यामुळे राजू आरवेलीवार आणि रवींद्र लेनगुरे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Advertisements
error: Content is protected !!