April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

भद्रावती पोलिसांची दादागिरी ? घराजवळ बसलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून बेदम मारहाण !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य पत्रकारांस भद़ावती पोलिसांची घरासमोरच विनाकारण बेदम मारहाण.
पत्रकार संघाकडून पोलिसाविरोधात तीव्र संताप !

देशात सर्वत्र कोरोना व्हायरस ला आटोक्यात ठेवण्याकरिता संचारबंदी लावून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी ही अर्थातच पोलिस प्रशासनाकडे आली, सोबतच संचारबंदीतही पत्रकार हे व्रुत्त संकलन करून जनतेपर्यंत या व्हायरसच्या प्रभावाचे आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती पोहचवीत आहे मात्र काही ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून पोलिस प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्ताच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला विनाकारण झोडपून काढत असल्याच्या अनेक तक्रारी प्रसारमाध्यमांमधे चर्चील्या जात असतांनाच आता भद्रावती पोलिस स्टेशन मधील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी चक्क आपल्या घराजवळ खुर्ची टाकून बसलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका प्रशीद्धी प्रमुख असलेल्या उमेश कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,

 

 

दिनांक २६ मार्च रोजी आपल्या घराजवळ खुर्ची टाकून बसलेल्या उमेश कांबळे या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रशीद्धी प्रमुखांना दोन पोलिस मोटारसायकल वरून येतात व त्यांना साल्या आपल्या घरी हो असे बोलून बेदम मारहाण करतात हा काय प्रकार चाललाय?  हे कळायला मार्ग नसून देशाची संचारबंदी भद्रावती पोलिसांच्या अंगात तर आली नसावी? अशी शंका निर्माण होतं आहे.

 

मात्र हे क्रुत्य पोलिस वर्दीला कलंकीत करणारे असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनील बोकाडे’, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी याबाबत तीव्र शब्दांत पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करून हे क्रुत्य करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.एवढेच नव्हे तर या संदर्भात संघाचे राज्य अध्यक्षयांना या संदर्भात माहिती देवून पोलिस अधीक्षकांना सुद्धा संघातर्फे संबंधीत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरल्या जाईल असे संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे यांनी आम्हच्या प्रतिनिधीशी बोलताना आपले मत व्यक्त केले आता त्यामुळे भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार काय भूमिका घेतात याकडे  भद्रावतीकरांचे लक्ष लागून आहे.

Advertisements
error: Content is protected !!