April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्ह्याचे नागरिक सहकार्य करावे महत्वपूर्ण काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे ,

चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस प्रशासन सहकार्य करावे

चंद्रपूर जिल्ह्याचे नागरिक सहकार्य करावे महत्वपूर्ण काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे व चंद्रपूर जिल्ह्याचे नागरिककाने मास लावून रावे कुठे बाहेर गेले तर आणि दोघ पेक्षा जास्त राहूनये व सर्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये

कोरोनाच्या विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाकडून घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांनी अत्यावश्यक कार्याशिवाय बाहेर पडू नये असे सक्त मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले.

 

तरीही चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

संपूर्ण देशभरात 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रविवारी रात्री 9 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र चारबंदी लागू केली होती.ही संचारबंदी शिथिल होताच सकाळी 7 ते 10 वाजण्याच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. अनेकांनी केवळ बाहेर काय चाललय? कलम 144 म्हणजे नेमकी काय असते? हे अजमविण्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दुचाकी किंवा आपल्या खासगी मोटार कारने बाहेर पडले.

 

आता संपूर्ण राज्यात संचारबंदी असून आंतरजिल्हा बंदीही लागू झाली असली तरीही नागरिक चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी विनाकारण फिरताना आढळून येत असल्यामुळे नाईलाजास्तव सुरताई करून भ्रमण करणाऱ्यांवर मज्जाव करण्यात येत असल्याचे वायरल विडिओ मधून समोर येत आहे.

विडिओ : 24 मार्च 2020

दृश्य पहिले – चंद्रपूर शहरातील मुख्य मार्ग गिरनार चौक ते गांधी चौक दरम्यान असलेल्या सराफा बाजार समोरील रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी सुताई.

 

दृश्य दुसरे : जिल्ह्यात जमाव बंदी – संचार बंदी असूनही लग्नकार्यात 200 लोकांचा स्वयंपाक शिजविणाऱ्या आचाऱ्याची सुताई व कुटुंबावर कार्यवाही.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्याकरिता आपल्याला जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, वैद्यकीय यंत्रणेची टीम कृतज्ञ असून नागरिकांनी या सर्व सहकाऱ्यांचा मानवीय दृष्टीकोनातून विचार करून तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व घरीच राहून कोरोनाचा धोका टाळावा

Advertisements
error: Content is protected !!