आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारकडे मागणी
कोरोना विषाणुचा संसर्ग देशात पसरत असल्यामुळे केंद्र तसेच सर्वच राज्य सरकारांनी शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिका-यांच्या उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. अनेक सेवा 31 मार्च पर्यंत बंद केल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने युध्दस्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांना आर्थीक वर्ष संपताना इन्कमटॅक्स रिटर्न्स, अग्रीम टॅक्स, टीडीएस, जीएसटीआर आदीचा भरणा करण्याकरिता 30 मार्च 2020 ही निश्चीत करण्यात आलेली तिथी महिनाभर वाढवून 30 एप्रिल 2020 करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांना यासंदर्भात पाठविलेल्या पत्राद्वारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली आहे. प्रामुख्याने वित्तीय वर्ष 18-19 मध्ये उशिरा भरण्यात येणा-या इन्कमटॅक्स रिटर्न्ससाठी अंतिम तिथी 31 मार्च निश्चीत करण्यात आली आहे तसेच रिव्हाईज्ड रिटर्न्स भरण्यासाठी सुध्दा 31 मार्च ही तारिख निश्चीत करण्यात आली आहे. ही तिथी 31 एप्रिल पर्यंत वाढवावी. अग्रीम टॅक्स भरण्यासाठी निश्चीत करण्यात आलेली 31 मार्च ही तिथी महिन्यावर वाढवावी व विलंबामुळे कलम 234 (बी) अंतर्गत करण्यात येणारी व्याजाची आकारणी माफ करण्यात यावी, टीडीएस भरण्यासाठी 30 एप्रिल 2020 ही तिथी निश्चीत करण्यात आली आहे ती महिन्याभर वाढवावी, जीएसटीआर भरण्यासाठी 22 मार्च 2020 ही तारिख निश्चीत करण्यात आली असून ती 22 एप्रिल 2020 करण्यात यावी तसेच यासंदर्भात आकारण्यात येणारा दंड व व्याज माफ करावे, विवाद से विश्वास या योजनेची तिथी 31 मार्च 2020 आहे ती सुध्दा महिनाभर वाढविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
कोरोनाशी झुंज देण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. यासाठी सॅनिटायझर आणि मास्क चा मोठया प्रमाणावर वापर देशभर केला जात आहे. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्क यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी सुध्दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
More Stories
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्ध्यांचे उद्या ‘भिक मागो’ आंदोलन
राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.
भद्रावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून लाखोंची हप्ता वसुली?