April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात भाजपा पदाधिका-यांनी केले सॅनिटायझर वितरण

22 मार्च च्‍या जनता संचारबंदीला प्रतिसाद देण्‍याचे आवाहन
 
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने आज दिनांक 20 मार्च रोजी बल्‍लारपूर शहरातील दुकानांमध्‍ये तसेच फळ व भाजी विक्रेते व किरकोळ व्‍यावसायिकांमध्‍ये सॅनिटायझर चे वितरण भाजपा पदाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आले. यावेळी कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्‍यासाठी जनजागृती करणा-या पत्रकांचे वितरण सुध्‍दा नागरिकांमध्‍ये करण्‍यात आले.

भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल आणि भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांच्‍या नेतृत्‍वात ही मोहीम आज बल्‍लारपूर शहरात राबविण्‍यात आली. शहरातील मोठी दुकाने तसेच किरकोळ व्‍यावसायिकांमध्‍ये 500 ml आणि 100 ml च्‍या  सॅनिटायझर च्‍या बॉटल्‍स वितरीत करण्‍यात आल्‍या. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने घ्‍यावयाची काळजी व उपाययोजना याबाबतची माहिती देणारी पत्रके सुध्‍दा भाजपा पदाधिका-यांनी नागरिकांमध्‍ये वितरीत केली.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता संचारबंदी पाळण्‍याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. कोरोनाशी दोन हात करत राष्‍ट्रहीत जपण्‍यासाठी या जनता संचारबंदीच्‍या पंतप्रधानांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देण्‍याचे आवाहन यावेळी चंदनसिंह चंदेल आणि हरीश शर्मा यांनी केले. यावेळी प्रमुख भाजपा पदाधिका-यांमध्‍ये भाजपा नेते काशी सिंह, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, आशिष देवतळे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, सतिश कनकम, श्री. वाजपेयी, विकास दुपारे आदींची उपस्थिती होती.

Advertisements
error: Content is protected !!