April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

देर है मगर अंधेर नहीं! अखेर निर्भयाच्या दोषींना फासावल लटकवलं

दिली येथील २०१२ सालातील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आले. तिहार तुरुंगाचे महानिरीक्षक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली.आपल्याला अखेर न्याय मिळाला अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईने व्यक्त केली.

फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. दिल्ली हायकोर्टाने दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. आरोपींचे वकील ए.पी. सिंग यांचे कोर्टाने कडक शब्दात कान उपटले. त्यांच्या दाव्यांना काहीही अर्थ नाही असं कोर्टाने म्हटले. पहाटे याबाबत अंतिम निर्णय देण्यात आला.
आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनी न्यायालयाकडे आणखी दोन ते तीन दिवसांची वेळ मागितली

जी कागदपत्रं जमा करायची होती त्यासाठी वेळ हवा असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायलयाने त्यांचे हे म्हणणे ऐकून घेतले नाही. रात्रीचे १०.४५ वाजून गेले आहेत. पहाटे ५.३० ला फाशी द्यायची आहे. काही महत्त्वाचं आणि ठोस मुद्दे असलेलं काही असेल तर आम्हाला सांगा असं न्यायलयाने सिंग यांना सांगितलं. मला वेळ मिळाला तर मी सगळ्या गोष्टी समोर ठेवेन असे जेव्हा सिंग म्हणाले. त्यावर चौथ्यांदा डेथ वॉरंट लागू करण्यात आले आहेत त्याचे काहीतरी पावित्र्य ठेवा असे कोर्टाने म्हटले.

अखेर कोर्टाने निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीवर अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आज पहाटे या सर्वांना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले

Advertisements
error: Content is protected !!