
चंद्रपूर शहरातील वडगाव येथील अपेक्षा नगर, सोमय्या पॉलीटेकनिक जवळील नझूल च्या जागेवर असलेल्या वस्तीत राहणाऱ्या दलित विधवा महिलेच्या घरावर ह्याच मनसे पदाधिकारी भरत गुप्ता, मुलांनी बिल्डर निलावार व कन्चर्लावार यांच्याकडून सुपारी घेवून जबरदस्तीने जेसिबी मशीन नेऊन ते घर जमीनदोस्त केले, त्या दरम्यान तेथील काही महिला पुरुषांनी विरोधी केला असता त्यांना तलवारी, चाकू चा धाक दाखवून त्यांना चुप केले व तूमचे घर सुद्धा असेच पाडण्यात येईल अशी तयां धमकी दिली असल्याची माहीती प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिली
घर पूर्ण तोडफोड केल्यानंतर घरातील संपूर्ण साहित्य ढिगाऱ्यात दाबले होते व पिडीत विधवा महीलेला हे द्रुष्य बघून चक्कर आली होती व रुग्णालयात भर्ती सुद्धा करण्यात आले होते.
ही गंभीर बाब शिवसेनेचे प्रमोद पाटील स्वप्नील काशीकर यांच्या लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी पिडीत विधवा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी रामनगर पोलिस स्टेशन गाठले आणि पिडीत महीलेने आपल्या मुलाला समोर करून तक्रार दिली त्या तक्रारी वरून.बिल्डरावर गुन्हे दाखल झाले
रामनगर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 0311/2020 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादंवि 143,147,149,448,427,506 नुसार काल 18 मार्च 2020 ला रात्री 2:16 मिनिटांनी दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात बिल्डर दत्तू कंचर्लावार, गजानन नीलावार यांच्यासहित मनसेचे भरत गुप्ता इतर 4 ते 5 मुले व तीन बाया असा उल्लेख घेण्यात आला
स्टेशनचे ठाणेदार प्रकाश हाके हे पुढील तपास करीत आहे.
Advertisements
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद