April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

राजुरा नगर पालिकेचे कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते 5000 हजार रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडले ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 

राजुरा नगर पालिकेचे कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते ह्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच 5000 हजाराची लाच घेताना आज दिनांक 17 मार्च ला दुपारी 3:15 च्या दरम्यान रंगेहात पकडले असून अटक कार्यवाही राजुरा पोलीस ठाणे येथे सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सविस्तर वृत्त असे की राजुरा आसिफ मुसा नामक व्यक्तींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांचेकडे त्यांच्या घराच्या कागदपत्रे फेरफार संबंधी काही अडचणींना सोडविण्यासाठी आणि दस्तावेज दुरुस्त करून देण्यासाठी सातपुते ह्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्याचे समजते .

परंतु त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने मुसा ह्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करून आज 5 वाजताच्या सुमारास विभागाने रचलेल्या सापळ्याप्रमाणे त्यांच्या कार्यालयात 5000 रुपये लाच दिली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांना तत्काळ रंगेहात अटक केली असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.

Advertisements
error: Content is protected !!