April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहे, त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरू नका – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हावाशीयांना आव्हान !

कोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५ लागू करून हव्या त्या उपाययोजना केल्या असल्याने जिल्ह्यातील जनतेने घाबरून न जाता व कुठल्याही अफवेला बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने व्यवस्थापन समिति स्थापन केली त्या प्रमाणेच तालुका स्तरावर देखील आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सोबतच गाव पातळीपर्यंत आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याची यंत्रणा सुद्धा सज्ज करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या १७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
ते सर्व निगेटिव अर्थात धोक्याबाहेर आहेत.यामध्ये चीन , इटली (२), इराण (१), दुबई (५), सौदी अरब (५) तर अन्य राज्यातून आलेले १७ असे एकूण ३३ नागरिकांची तपासणी केली आहे.
अन्य राज्यातून आलेल्या मुलांमध्ये गुलबर्गा कर्नाटक येथून आलेल्या १७ मुलांचा समावेश आहे.
आतापर्यंत ४ रुग्ण अॅडमिट झाले आहे. चोवीस संशयितांना होम कॉरन्टेटाइन करण्यात येत आहे. ५ जणांना १४ दिवसांच्या तपासणी नंतर सुटी देण्यात आली आहे.
संशयित वाटणाऱ्या रुग्णांची देखील तपासणी करण्यात आली असून ते सर्व निगेटिव अर्थात धोक्याबाहेर आहेत, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात – रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले, जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व विश्रामगृहाना कोरोन्टाईन करण्यासाठी राखीव करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.गाव पातळीवरील प्राथमिक शाळा वगळता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रातील सर्व खाजगी शासकीय शाळांना ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदीचे निर्देश देण्यात आले आहे, जिल्ह्यात विदेशी गेलेल्या व संभाव्यता या काळात परत येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना कॉरेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन व ऐतिहासिक अशी २५ मार्चपासून गुढीपाडव्याच्या पर्वावर सुरु होणारी महाकाली यात्रा स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील चित्रपटगृहे नाट्यगृहे मॉल जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लग्नकार्य व अन्य सामाजिक एकत्रीकरण, यात्रा, महोत्सव, जन्मदिवस, उरूस, धार्मिक कार्यक्रम, सहली, स्नेहसंमेलने, याकाळात पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आले आहे.

सर्व शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्याठिकाणी आवश्यक स्वच्छतेच्या उपायोजना सुचविण्यात आल्या आहे.

Advertisements
error: Content is protected !!