January 19, 2021

Maharashtra Metro

online news portal

अटल घरफोडी चोराला रामनगर पोलिसांनी केली अटक ,

चंद्रपूर शहरात घरफोड्या करणारे आणि गाडी, टायर व बैटरी चोरी करणाऱ्यांची संख्या वाढत असतांनाच पोलिसांनी सुद्धा आरोपींना शिताफीने पकडण्याचे तंत्र अवलंबले आहे. चंद्रपूर अस्टभुजा येथे राहणारा संदीप भगवान सोरते या चोरट्याला ताब्यात घेवून त्याचेकडून जवळपास ८० हजाराचा मुद्देमाल जब्त केला आहे. कुणाच्या घरून किंव्हा दुकानातून गाड्यांच्या बैटर्या चोरी.गाड्यांचे सामान व रेल्वेचे साहित्य चोरी करण्यात अग्रेसर अशा या संदीप सोरतेचा पीसीआर घेवून पुन्हा इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे कां ? याबद्दल माहिती घेवून लवकरच ह्या चोराकडून अनेक चोऱ्याचे उलगडे होणार असल्याची प्रतिक्रिया रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना व्यक्त केली.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दरेकर, उपपोलिस निरीक्षक कापडे, गजू दहिफोडे,राम भाऊ राठोड. चिकाटे व इतरांनी केली .

Advertisements
error: Content is protected !!