April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

वाघाचा मृत्यू बामणी गावातली घटना एका शेतात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला

गोंडपिंपरी तालुक्यातील कोठारी रेंजमध्ये बामणी इथं एका शेतात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. बामणी गावालगत हे शेत असून उभ्या पिकांत हा बछडा मृतावस्थेत पडून असल्याचं सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पंचक्रोशीत बातमी वणव्या सारखी पसरून नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळी हा बछडा मृत नसून श्वास घेत अर्ध मृत अवस्थेत असल्याचे आढळले.त्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला असावा.

वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, पोस्टमार्टेमसाठी शव नेण्यात आलं. या बछड्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा बछडा साधारणपणे वर्षभराचा असल्याचं सांगितलं जातं. या बछड्याच्या मृत्यूमुळं वनविभाग चांगलाच हादरला आहे.

Advertisements
error: Content is protected !!