April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची महाकाली यात्रा स्थगित मनपाद्वारे दिल्या जाणार नाही कुठलीही सुविधा,  

चंद्रपूर १२ मार्च – चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाची दखल घेऊन जिल्हा पातळीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक पाऊले उचललेली जात आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून दरवर्षी होणारी महाकाली यात्रा यावर्षी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाद्वारे स्थगित करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनपाद्वारे केल्या गेलेल्या उपाययोजनांचा आढावा आयुक्त संजय काकडे यांच्याद्वारे घेण्यात आला. दरवर्षी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे यात्रेप्रसंगी करण्यात येणाऱ्या पाणी व्यवस्था, रुग्णवाहिका व आरोग्य सुविधा, दुकानव्यवस्था, स्नानव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षा व्यवस्था, विदयुत व्यवस्था इत्यादी सोयी मनपातर्फे केल्या जातात. मात्र यावर्षी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मनपाद्वारे केल्या  जाणार नसून कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्ससुद्धा स्टॉल्सधारकांना लावता येणार नाही.
कोरोना बाबत भीती बाळगण्याची गरज नाही, मात्र सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याने सार्वजनीक ठिकाणी जाणे, ज्या ठिकाणी गर्दी असेल, एकाचवेळी अनेक लोकांचा वावर असेल अश्या ठिकाणी जावयास टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनाद्वारे सदर निर्णय घेण्यात आला आहे .
Advertisements
error: Content is protected !!