April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

पोंभुर्णा एम.आय.डी.सी. साठी संपादीत कोसंबी रिठ येथील शेतजमिनीचा मोबदला देण्‍याबाबत शासन सकारात्‍मक

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या तारांकित प्रश्‍नाला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे उत्‍तर

मौजा कोसंबी (रिठ) येथील संपादीत होणा-या जमिनीचा मोबदला शेतक-यांना वाटप करुन 10.75 हे.आर. जागेचा ताबा महामंडळास प्राप्‍त झालेला आहे. सलगतेने उपलब्‍ध होणा-या उर्वरीत क्षेत्रासाठीच मोबदला वितरण करुन भुसंपादनाची कार्यवाही भुसंपादन अधिकारी यांचे मार्फत चालु आहे, अशी माहीती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नाच्‍या उत्‍तरात दिली.

दि. 12.03.2020 रोजी विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्‍या तारांकित प्रश्‍नाच्‍या उत्‍तरात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वरील माहीती दिली. पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी. साठी कोसंबी (रिठ) येथील संपादीत शेतजमिनींचा मोबदला अद्याप संबंधित शेतक-यांना मिळाला नसल्‍याच्‍या बाबीकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुळ तारांकित प्रश्‍नाच्‍या माध्‍यमातुन सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणी उद्योग मंत्र्यांनी चंद्रपूरला बैठक घेण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या प्रश्‍नावरील चर्चेदरम्‍यान केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत सकारात्‍मक उत्‍तर दिले.

राज्‍यातील भटक्‍या व विमुक्‍त जातीच्‍या मुला मुलींना शिक्षणाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर पुर्व प्राथमिक ते पदव्‍युत्‍तर इंग्रजी माध्‍यमातुन शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी तारांकित प्रश्‍नाच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली असता याबाबत संचालक उच्‍च शिक्षण पुणे यांच्‍याकडुन अभिप्राय मागविण्‍यात आले आहे तसेच शालेय शिक्षण विभाग आणि सामाजिक विभागास आवश्‍यक कार्यवाही करण्‍यासाठी विनंती करण्‍यास आली असल्‍याची उच्‍च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!