April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

शिवसेनेची पर्यावरण पूरक शिवजयंती : छत्रपतींच्या 390व्या जयंती निमित्य 390 फळ झाडें घरोघरी लावून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

आज दिनांक 12मार्च 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 390व्या जयंती निमित्य संपूर्ण जगात सुरु असलेल्या कोरोना वायरस च्या दहशतीमुळे रॅली ची गर्दी टाळून शिवसैनिकांनी स्वतः चंद्रपूर शहरात घरोघरी जाऊन 390झाडांचे वाटप करून पर्यावरण पूरक सामाजिक संदेश दिला.

संपूर्ण जगात सुरु असलेल्या कोरोना वायरस च्या भीतीमुळे जमाव एकत्रित करण्यास आरोग्य विभागातर्फे वारंवार सूचना देण्यात येत आहेत. शिवाय वातावरणातही प्रचंड बदल जाणवत असून उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 50 डिग्री च्या आसपास जाऊन पोहोचते. त्यातही गेल्या वर्षभरापासून सतत ऊन व लगेच पाऊस अश्या हवामान बदलामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व बाबींची दक्षता घेत शिवसेना चंद्रपूर तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्य संपूर्ण चंद्रपूर शहरात शिवसैनिकांनी 390 वेगवेगळ्या प्रजातींची झाडें गृहिणींना दिली व पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटऊन दिले.

या विधायक उपक्रमाची रॅली चा मोह टाळून पर्यावरण जनजागृती करीत असलेले शिवसैनिक बघून शहरात विविध प्रभागांमधील नागरिकांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या निसर्गा प्रति असलेल्या विविध धोरणांना समर्पित असे कार्य सुरु असल्याचा आनंद होता.

हा पर्यावरण पूर्वक उपक्रम शिवसेना मा शहर प्रमुख श्री मनोज पाल यांच्या मार्गदर्शनात गोमती पाचभाई, नितीन शहा, सुनीता जयस्वाल, भावना सिकराम, सुलोचना मेश्राम, कल्पना गेडाम, गीता दाखुरे, पंकज सिंग दीक्षित, संजय शहा, माधव पाल, राज पाचभाई यांचे सहित अनेक शिवसैनिकांनी यांनी शहरातील विविध प्रभागात राबवून पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!