April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या परिसरात अर्ध तुटलेला मानवी पाय सापडल्याने परिसरात खडबड उडाली आहे.

 

विधी महाविद्यालय प्रांगणातून निघणाऱ्या तुकूम रोडवरून जात असताना दुपारी 1:30 वाजताच्या आसपास एका शाळकरी मुलाला पायाचा तुकडा पडून दिसताच त्याने घाबरून बाजूच्या वसाहतीतील एका जेष्ठ नागरिकाला माहिती दिली असता त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाणे येथे कळविले.

त्यानंतर लगेच डिबी पथकाने ठिकाण गाठत गंभीर घटना ध्यानात घेऊन डॉग स्कॉड ला पाचारण केले असून वृत्त लिहीत पर्यंत पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, निरीक्षक प्रकाश हाके सुद्धा घटनास्थळी उपस्थिती होते असून नेमका काय प्रकार आहे अधिक तपास सुरु आहे.

Advertisements
error: Content is protected !!