April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

मनसे महिला सेनेने अनोख्या पद्धतीने साजरा केला जागतिक महिला दिन !


कोरोना व्हायरल बघता चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई महिला कामगारांना मास्क व हँडक्लोज देवून सत्कार !

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या महिला कामगारांना जागतिक स्तरावर कोरोना आजार व व्हायरल बघता आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क व हँडक्लोज देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना व्हायरस पासून गरीब महिलांची सुरक्षा करण्याकरिता महिला सेनेतर्फे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्य घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या महिलांना मास्क व हैंडक्लोज वाटप दुपारी 3 वाजता संजय गांधी मार्केट यार्ड मधे करण्यात आले. याप्रसंगी मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, जिल्हा सचिव किशोर मडगूलवार, मनोज तांबेकर, फिरोज शेख. नितेश जुमडे, राहुल क्षीरसागर, करन नायर. कृष्णा गुप्ता, राजू वर्मा, नगरसेविका सिमा रामेडवार, वनिता चिलके, अर्चना आमटे, विमल लांडगे. वंदना वाघमारे.रंजना डाहाके.ॲन्ड.विना बोरकर, वर्षा बौम्बले, शोभा पवार. कोटेश्वरि गौहणे. रानी नाण्डुरकर, संगीता गोलेवार. प्रीती रामटेके, मानसी रामटेके, स्मिता दोणीवार तारा आत्राम, अर्चना वासनिक, मीनाक्षी जीवने, उषा शातरडे,प्रिया शातरडे, इत्यादींची उपस्थिती होती .

Advertisements
error: Content is protected !!