April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस रामनगर पोलीसांकडुन अटक

दिनांक ०४/०३/२०२० रोजी महिला फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे तकार दिली की, फिर्यादी हया सकाळी मॉर्निंग वॉक करून आपले घराकडे परत जात असतांना कोणीतरी अज्ञात पांढरे रंगाची टी शर्ट व फुलपॅन्ट घातलेल्या इसमाने फिर्यादीचे पाठीमागुन येवुन फिर्यादी महिलेच्या गळयातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किं.

२४,०००/-रु. ची जबरीने हिसकावुन पळुन गेला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क २४३/२०२० कलम ३९२ भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला.

गुन्हयाचे तपासादरम्यान फिर्यादी महिला व प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपीचे केलेले वर्णन व गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर खबरेवरून एका संशयीत इसमास ताब्यात घेवून त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा दुसऱ्या आरोपीत इसमासोबत मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने १ साहील इस्माईल शेख वय १९ वर्षे, २ सुशील मुनेश्वर खोब्रागडे वय १९ वर्षे, दोन्ही रा. चंद्रपूर या दोघांनाही ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपींकडून सदर गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे व तुटलेली सोन्याची साखळी किं. २४,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Advertisements

सदरची कार्यवाही डॉ. श्री. महेश्वर रेडडी, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामनगर श्री. प्रकाश हाके यांचे नेतृत्वात सपना, संतोष देवकर, सफौ. प्रभुदास माहुलीकर, सुधीर जाधव, पोशि, पुरूषोत्तम चिकाटे, पोशि. निलेश मुळे, माजीद पठाण या पोलीस पथकाने पार पाडली. सदरची उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबाबत डॉ. श्री महेश्वर रेडडी, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे हस्ते प्रोत्साहनपर बक्षिस आणि प्रशस्तीपत्र पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

Advertisements
error: Content is protected !!