April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

संग्रामपुर : दोघांचे ७० फुट खोल विहिरीत उपोषण. अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.

(संग्रामपूर प्रतिनिधी):- संग्रामपूर नगरपंचायत कडून शहरातील समस्या सोडविल्या जात नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाला वैतागून येथील दोन नागरीकांनी दि. ३ रोजीच्या मध्यरात्रीनंतर विहिरीत उतरून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. वार्डात मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील नागरिकांनी ७० फूट खोल विहिरी उतरुन उपोषण उपोषण सुरू केल्याने संग्रामपूर शहराचा विकासचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील वार्ड क्रमांक ७ मध्ये रहिवासी असलेले सौरव बावस्कार, विकी भटकर या दोघांनी मंगळवारी वारी रोजी रात्री २ वाजता पासून वार्डातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संग्रामपूर तहसील आवारात असलेल्या 70 फूट खोल विहिरीत बेमुदत उपोषण सुरू केले.वार्डातील विविध समस्या सोडवण्यासाठी यावे यासाठी प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. मात्र नगरपंचायतीने यांच्या मागण्याकडे कायम दुर्लक्ष केले. तहसीलचे शासकीय निवास्थानातील सांडपाणी वसाहतीत येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सदर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाली बांधकामाची मागणी करण्यात आली. वार्डाला रस्ता उपलब्ध करून येथील रमाई घरकुल योजने अंतर्गत थकित असलेले तात्काळ देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत वार्डातील समस्या सोडविण्यात येणार नाहीत तोपर्यंत विहीरीत उपोषण सुरूच राहणार असल्याचा पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.

Advertisements
error: Content is protected !!